संभ्रम निर्माण होईल असे काम भिष्म पितामह यांनी करू नये, अजित पवार यांच्या गुप्त भेटीवरून संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ : अजित पवार यांच्या गुप्त भेटीवरून संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर संतापले. संभ्रम निर्माण होईल, असे काम भिष्म पितामह यांनी करू नये. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चहा प्यालो तर चालेल का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचे शिलेदार संजय राऊत अजित पवार, शरद पवार यांच्या गुप्त भेटीवरून भडकले.आपला भाजपशी संबंध नाही. उलट तुम्ही बोलून वारंवार संभ्रम निर्माण करता, असे संजय राऊत म्हणाले.

दोन नेत्यांमध्ये परवा बैठक झाली. त्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतात. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम येईल, अशाप्रकारचे नेतृत्व भिष्म पितामह यांनी करू नये. त्याबाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे लोक आहोत. नाती-गोती प्रेम घरामध्ये. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून आम्हाला कुणी आव्हान देत असेल, तर ते योग्य नाही, असेही राऊत म्हणले.

शरद पवार म्हणाले, संभ्रम वैगेरे काही नाही. महाविकास आघाडीमध्ये विचाराने जे एकत्र आले त्यांची भूमिका आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधा संबंधित घेतलेली आहे. भाजपच्या घटकांशी आमचा कुठलाही संबंध असण्याचे कारण नाही. मी भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभ्रम राहिलेला नाही,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. तरीही पुण्यात अजित पवार आणि शरद पवार भेटतात. त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जागा निर्माण होण्यास जागा आहे. असा हल्ला सामनामधून करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत. शरद पवार हे या भेटी वारंवार टाळत आहे. काही भेटी उघडपणे झाल्या. तर काही गुप्तपणे झाल्याचे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा