भोकरदन तालुक्यात अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर कारवाई

जालना, दि.२५ मे २०२०: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवारी( दि.२४) रोजी सकाळी पारध पोलीस ठाण्याचे स. पो. नि.
शंकर शिंदे यांना माहिती मिळाली होती की, विदर्भातील धाड (जि. बुलढाणा )येथील एका परवानाधारक देशी दारू दुकानातून मराठवाड्यातून काही लोकं देशी दारू मोटार सायकलद्वारे चोरटी विक्री करण्यासाठी नेणार आहेत.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिंदे आणि त्यांचे सहकारी उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, प्रदीप सरडे, समाधान वाघ, सुरेश पडोळ, नितेश खरात, विकास जाधव, जीवन भालके यांच्या पथकाने रविवारी दुपारी अवघडराव सावंगी ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथील एका शेताजवळ सापळा लावला.

यावेळी एका मागोमाग एक अशा मोटारसायकली आल्या त्यावर काही गोण्यामध्ये, वायरच्या पिशव्यांमध्ये, सॅकमध्ये, बनियनच्या आत अशा प्रकारे धाड, जि. बुलढाणा येथून दारूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले.

या सर्वांकडून पारध पोलिसांनी ७२,००० हजारांची देशी दारू आणि तीन लाखांच्या १२ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली असा एकूण तीन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून त्या एकवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पो. हे. कॉ. प्रदीप सरडे हे करीत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा