आश्रम मधील भोपा आणि साहेबांवर टिका करणारा “गोपा” दोघेही सारखेच….

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२०: सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे अजूनही आहे तसेच वाहत आहेत. मध्यंतरी भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्यावर छोटे नेते म्हणून टिका केली होती. ज्या नंतर चंद्रकांत दादा पाटील यांना ट्रोलर्स आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच सामना करावा लागला. ज्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवरांवर शरसांधन डागत ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून आले नेत्याला लोक नेता म्हणतात तर मग ३०३ खासदार निवडून आणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं?, असा प्रश्न उपस्थित केला.

ज्या नंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांवर चांगलीच तोफ डागली. मिटकरींनी पडळकरांची तुलना “आश्रम” या प्रसिद्ध आणि बहुचर्चित वेब सिरीज मधील “भोपा” स्वामींशी केली आहे.”आश्रम” मधे जपनाम करणारा “भोपा” आणि साहेबांवर टिका करणारा (भा) जपनाम वाला “गोपा” सारखेच. ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अश्या वाचाळवीरांनी औकात पाहून साहेबांवर बोलावं असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. त्यांनी गोपीचंद पडळकरांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

शरद पवारांवर झालेल्या टिकेवर शिवसेनेने ही भाजपचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेने नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी “आपण कोणावर टिका करतोय याचा अभ्यास चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी करायला हवा.शरद पवारांचे कर्तृत्व आधी त्यांनी पहायला हवे. वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आणि पुढे ५० वर्ष ते राजकारणात सक्रीय राहीले. त्यामुळे टिकाकारांनी एकदा स्वत:ला पवारांसमोर ठेवून तपासायला हवे. पुढे पडळकरांवर निशाणा साधत ते म्हणाले पडळकरांवर भाजपचे संस्कार नाहीत भाजपमधील व्यक्ती अशी बोलणार नाही. भाजपमधील भेसळीचा हा परिणाम आहे. “असा सणसणीत टोला अनिल परब यांनी लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा