भुलेश्वराची श्रावण यात्रा यंदा रद्द.

पुरंदर, दि. १६ जुलै २०२० : संपूर्ण महाराष्ट्राचे जागृत देवस्थान, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुलेश्वर महादेवाची श्रावण यात्रा दिनांक २१ जुलै पासून सुरू होत आहे. परंतु, सध्या असणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.याबाबतची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये श्री शंभू महादेवाचे स्थान असलेल्या भुलेश्वराच्या दर्शनासाठी हजारो लोक येत असतात. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता यात्रे संदर्भात एक बैठक घेण्यात आली. यामध्ये भुलेश्वर मंदिर येथील सुरक्षा व यात्रा नियोजन या विषयावर चर्चा करून यावर्षी भुलेश्वर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती रुपाली सरनोबत यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे कोणतेही धार्मिक विधी होणार नाहीत,फक्त पुजारी येऊन मंदिरात पूजा करतील. या यात्रा काळात जर कोणी या ठिकाणी आले तर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल. सध्या असणाऱ्या कोरोना हा विषाणूजन्य आजार फैलू नये म्हणून प्रत्येकाने नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

यावेळी माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, पंचायत समिती पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव, पोलीस पाटील पुजा यादव मंडल अधिकारी भारत भिसे व गाव कामगार तलाठी सतीश काशीद, ग्रामसेविका सोनाली पवार, भुलेश्वर सेवा ट्रस्ट अध्यक्ष अरुण यादव, भुलेश्वर देवस्थानचे सर्व पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा