गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा वाघोलीतील विविध विकास कामाचे गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन

वाघोलीतील विविध विकास कामाचे गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन

वाघोली, दि. १६ ऑगस्ट २०२०: आज रोजी हवेली येथिल वाघोलीतील वार्ड क्रमांक ६ मध्ये ग्रामनिधीतून करण्यात येणाऱ्या १ कोटी ८२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन खासदार गिरीश बापट, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे.

यामध्ये वाघोली – आव्हाळवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण भूमिपूजन, पाचरणे हॉस्पिटल ते रिकामे घर रस्ता कॉंक्रिटीकरण उद्घाटन व वृक्षारोपण, अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता भूमिपूजन, सोसायटी अंतर्गत रेल्वेचे कॉंक्रिटीकरण उद्घाटन या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संजय सातव, नारायण आव्हाळे, दादासाहेब सातव, धर्मेंद्र खंडारे, अविनाश बरवे, वसुंधरा उबाळे, गणेश कुटे, उपसरपंच मालती ताई गोगावले, अश्विनी आव्हाळे, माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच जयश्री काळे, कविता दळवी, शरद आव्हाळे, अनिल सातव, गणेश गोगावले, गणेश सातव, तुकाराम आव्हाळे, व वाघोली आव्हाळवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version