गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा .अन बिबट्या पडला विहिरीत

.अन बिबट्या पडला विहिरीत

श्रीरामपूर : श्रीरामपुर तालुक्यातील गोखले वाडी येथिल मंगेश दाणे यांच्या घरासमोर रात्री ९च्या सुमारास बिबट्याने, कुत्र्यावर हल्ला केला. मात्र कुत्रा हल्ल्यातून बचावला आहे.मात्र बिबट्या शेजारी असलेल्या विहिरीत पडला. यावेळी या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता.
यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्या मदतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वनपाल संतोष जाधव यांना दिली. त्यांनंतर त्यांनी तात्काळ पिंजऱ्यासह वन विभागाची टिम घटनास्थळी पाठवली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला बाहेर पिंजऱ्यात जेरबंद करून नेले.

error: Content is protected !!
Exit mobile version