बारामती दि. २० (प्रतिनिधी): :बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे बिबट्याने सोमवारी(दि २०) सायंकाळी कळपातील मेंढीवर हल्ला केला. यावेळी कळपातील मेंढी बिबट्याने फरपटत
नेली.मात्र, धाडसी मेंढपाळाने बिबट्यावर काठीने प्रतिहल्ला केला. त्यामुळे जखमी मेंढीला सोडुन बिबट्याने पळ काढला. या प्रकरणाची दखल
वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री भरणे यांनी वनविभागाला दिले.
महादेव मारुती काळे असे या धाडसी मेंढपाळाचे नाव आहे. आज सायंकाळी काटेवाडी —कन्हेरी रस्त्यावर धनेवस्ती येथे काळे यांच्या मेंढ्याचा कळप
चरत होता. यावेळी ४.३० च्या सुमारास बिबट्याने अचानक कळपातील मेेंढी मानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यावेळी मेंढ्या चराईसाठी येथे थांबलेल्या काळे यांनी हा प्रकार पाहुन धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग
केला. तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटत नेली. मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरु ठेवत त्याच्यावर काठीने हल्ला
केला. त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊसक्षेत्रामध्ये पळ काढला.काळे यांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला आहे.
या घटनेमुळे परीसरात दहशतीचे वातावरण आहे. येथील स्थानिक शेतकरी भाऊसाहेब काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आज सायंकाळी अचानक बिबट्याने हल्ला केला.
आमच्या परीसरात सर्व शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शेतकरी शेतीला पाणी द्यायला सुध्दा घराबाहेर पडायला तयार नाहित.शेतकºयांसह दुभत्या जनांवरदेखील बिबट्याच्या हल्लयाच्या भीतीचे सावट आहे.
अवघ्या तीन दिवसांपुर्वी बिबट्याने परीसरात शुक्रवारी (दि १७) रात्री कुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परीसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.वनखात्याने या भागात तातडीने रात्रीची गस्त सुरु केली आहे. या भागात
वनखाते ‘ट्रॅप कॅ मेरे’ लावणार आहे.बारामती कटफळ परिसरातील एमआयडीसीतील
बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या आवारात ९ डीसेंबर २०१९ रोजी बिबट्याचा वावर कंपनीच्या सीसीटीव्ही मध्ये कै द झाला होता. हा बिबट्या अद्याप बारामती तालुक्यातच वावरत आहे. आजपर्यंत या
बिबट्याला प्रत्यक्ष कोणीही पाहिले नव्हते.मात्र, आज मेंढीवरील हल्ला झाल्यानंतर त्याच्या हल्लयाला प्रत्यक्ष मेंढपाळानेच तोंड दिले. त्यामुळे
तो बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना हि घटना गांभीर्याने घेत याप्रकरणी आवश्यक उपाययोजना करण्याचे वनविभागाला आदेश दिल्याचे सांगितले. शेतकºयांनी घाबरुन जावु नये,असे आवाहन भरणे यांनी केले आहे.