बिडेन सरकारमध्ये ब्लिंकन होणार परराष्ट्रमंत्री, काय आहे भारताविषयी मत

वॉशिग्टंन, २५ नोव्हेंबर २०२०: डोनाल्ड ट्रम्प गेल्यानंतर बिडेन यांचे परराष्ट्र धोरण मध्य-पूर्वेसाठी बर्‍याच बदलांची शक्यता आहे पण भारताबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन ट्रम्पपेक्षा फारसा वेगळा नसंल. हे आधीच अमेरिकेचे सुप्रसिद्ध मुत्सद्दी अँटनी ब्लिंकेन यांनी सूचित केलं आहे. बिडेन यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

भारत आणि अमेरिका या दोघांसाठी चीन आव्हान असंल्याघ अँटनी ब्लिंकेन यांनी सांगितलं आहे. परराष्ट्र धोरण तज्ज्ञ ब्लिंकेन म्हणालं की, चीनला रोखण्यात भारत महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचे सिद्ध होईल.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बिडेन यांच्या मोहिमेनं भारतीय-अमेरिकन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करतांना ब्लेकेन यांनी या गोष्टी बोलल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची प्रमुख भागीदारी कमकुवत करुन चीनला संधी मिळवून दिली आहे. जगात मोकळी जागा सोडून चीनला सामरिक धार मिळविण्यास मदत केली असा आरोप ब्लिंकेन यांनी केला होता. ब्लिंकेन म्हणाले की, ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन मूल्यं मागं सोडून चीनला हाँगकाँगमधील लोकशाही चिरडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

बिडेन प्रशासनात भारत-अमेरिका संबंध आणि भारतीय-अमेरिकन शी संबंधित विषयावरील चर्चेदरम्यान, ब्लिंकेन म्हणाले, एलएसीवरील भारताविरूद्ध चीनच्या आक्रमक वृत्तीसह, चीनशी आक्रमकपणे सामोरे जाण्याचे आपल्या दोघांचे आव्हान आहे. चीन इतरांना घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी आपली आर्थिक शक्ती वापरत आहे. आंतरराष्ट्रीय नियमांकडं दुर्लक्ष करून आपलं हित साधण्यासाठी चीन कोणत्याही भूमीवर आपला दावा मांडत आहे, यामुळं जगातील महत्त्वाच्या सागरी भागात प्रवास करण्याच्या स्वातंत्र्यालाही धोका निर्माण झाला आहे.

हाँगकाँगमधील चीनच्या कृती आपल्या स्वत: च्या लोकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे आणि लोकशाहीला चिरडून टाकणारे असल्याचं ब्लिंकेन यांनी वर्णन केलं.

हडसन इन्स्टिट्यूटमध्ये दिलेल्या भाषणात ब्लिंकेन यांनी भारत-अमेरिका संबंधांबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. ब्लिंकेन म्हणाले होते की, बिडेन यांच्या दृष्टीकोनातून भारताशी मजबूत आणि सखोल भागीदारीला प्राधान्य असंल. इंडो-पॅसिफिकच्या भविष्यासाठीही हे फार महत्वाचं आहे आणि योग्य, स्थिर आणि लोकशाही जागतिक सुव्यवस्थेसाठीदेखील ते आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा