बिडेन अमेरिकेत विजयी, ट्रम्प यांचा पराभव करत बनले ४६ वे राष्ट्रपती

वॉशिंग्टन, ८ नोव्हेंबर २०२०: जो बिडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविला आहे. बिडेन डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करून अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. बिडेन यांच्या विजयाचा दावा असोसिएटेड प्रेसनं केला आहे. बिडेन यांना २७३ मतं मिळाली आहेत. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं २१४ इलेक्ट्रॉल मतं देण्यात आली. पेनसिल्वेनियाच्या निर्णायक राज्यात बिडेन यांच्या विजयानंतर हा विजय निश्चित झाला आहे. 

डेमोक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांचा व्हाइट हाऊसचा प्रवास जवळपास पूर्ण झाला आहे. तसंच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाहीमध्ये उपराष्ट्रपती होणार आहेत. याबद्दल भारतातही उत्साह आहे.

बिडेन यांनी ट्विट करुन जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की तुम्ही मला देशाचे नेतृत्व करण्यासाठी निवडलं आहे. आपल्यापुढील कामं कठीण होतील, परंतु मी तुम्हाला वचन देतो की मी सर्व अमेरिकेतील नागरिकांसाठी राष्ट्रपती होईल मग तुम्ही मला मत दिलं असो किंवा नसो. तुम्ही माझ्यावर जे काही व्यक्त केलं त्यावर मी माझा विश्वास सिद्ध करीन.

उपराष्ट्रपती होणाऱ्या कमला हॅरिस यांनी ट्विट केलं आहे की हा विजय अमेरिकेच्या आत्मा आणि त्यासाठी लढा देण्याच्या आमच्या इच्छेविषयी आहे. आपल्या पुढं बरंच काम आणि आव्हान आहे तर चला सुरू करूयात…

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या रात्री या सर्व राज्यांमध्ये (अ‍ॅरिझोना, जॉर्जिया, नेवाडा आणि पेनसिल्व्हानिया) आपली मोठी आघाडी असल्याचा दावा केला होता. तसंच मतमोजणीत घोटाळा झाल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता. परंतु जसा जसा दिवस पुढौ जात गेला तशी आश्चर्यकारकपणे त्यांची ही आघाडी देखील पिछाडीवर जात गेली.

रात्री ८ नंतर मतपत्रिकेत मोठ्या प्रमाणात मेल आल्याचा आरोप ट्रम्प यांच्या पक्षानं केला. नियमांनुसार, तोपर्यंत मतदान संपलं होतं. ट्रम्प यांची मागणी होती की ही मतं मोजू नयेत. तथापि, पेनसिल्व्हेनिया येथील कोर्टानं सांगितलं की जर निवडणुकीच्या दिवसापूर्वी मतपत्रिका पाठविली गेली असंल तर निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबरनंतर ३ दिवसांनी मतदान मिळाल्यास त्याची गणना केली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा