गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय बायडेन यांच्या पत्नीने कमला हॅरिस यांच्या पतीला केले किस; व्हिडीओ व्हायरल

बायडेन यांच्या पत्नीने कमला हॅरिस यांच्या पतीला केले किस; व्हिडीओ व्हायरल

वॉशिंग्टन, ८ फेब्रुवारी २०२३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी नॅशनल कॅपिटलमध्ये दुसऱ्यांदा ‘स्टेट ऑफ द युनियन’ला संबोधित केले. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासह उपराष्ट्रपतींचे पतीही तेथे उपस्थित होते. बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाषणानंतर जिल बायडेन यांनी हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांना किस केले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिल बायडेन अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ चुंबन घेताना दिसत आहेत.

  • काय म्हणाले युजर्स ? हा व्हिडीओ पाहून युजर्स अनेक तर्कवितर्क लावत आहेत. जिल बायडेन आणि कमला हॅरिसच्या पतीसोबत हॅलो किस घेऊन आज स्टेट ऑफ द युनियनची सेक्सी सुरुवात, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर असे काही होईल, असा विचार कधीच केला नव्हता, असे दुसर्‍या युजरने म्हटले आहे.

दरम्यान, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकनला बहुमत मिळाल्यानंतर विभाजित संसदेत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या महत्त्वपूर्ण भाषणाचा हा पहिला प्रसंग होता, ज्यामध्ये त्यांनी रिपब्लिकन ‘मित्रांकडून’ सहकार्याचे आवाहन केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version