गुवाहाटी पोलिसांची मोठी कारवाई; ३.५० कोटी रुपयांचा ५०० किलो गांजा जप्त

19

गुवाहाटी, २९ नोव्हेंबर २०२२ गुवाहाटी शहर पोलिसांनी मंगळवारी एका ट्रकमधून ३.५० कोटी रुपयांचा ५०० किलो गांजा जप्त केला असून चार जणांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस सहआयुक्त पार्थ सारथी महंत यांनी सांगितले की, आम्हांला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सापळा रचून ट्रक अडवला असता त्यात सुमारे ३.५० कोटी रुपयांचा ५०० किलो गांजा सापडला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आसाममध्ये सतत होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. काही महिन्यांपूर्वी, आसाममधून गांजाच्या मोठ्या खेपाची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून, पोलिसांनी NH ८० वरील हेरुडियारा शहीद चौकातील ढाब्याजवळ एक ट्रक पकडला होता. झडतीदरम्यान ट्रकच्या केबिनमध्ये लपवून ठेवण्यात आलेला २०६.८ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. तसेच यावेळी तीन गांजा तस्करांना अटक करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा