ठाणे क्राईंम टिमची मोठी कारवाई; आठ कोटींच्या बनावड नोटा केल्या जप्त

नवी मुंबई , १२ नोव्हेंबर २०२२: ठाणे क्राईंम ब्रँचच्या युनिट पाचने पालघर एमआयडीसीत धाड टाकून दोन हजार रुपयांच्या नोटांचा छापखाना उध्वस्त केला. या छापखान्यात तब्बल आठ कोटींच्या दोन हजार रुपयांच्या बनावड नोटांचे बंडल सापडले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत ठाणे क्राईंमचे अप्पर पोलीस आयुक्त मोराळे यांना विचारले असता, पालघर एमआयडीसीत हा बनावड चलनी नोटांचा छापखाना सुरु आहे. यांची माहिती क्राईमच्या पाच नंबर युनिटला मिळाली. त्यानंतर शाहनिशा केल्या नंंतर छापखान्यावर धाड ठाकून नोटांचे बंडल पोलिसांना सापडले आहेत.

या प्रकरणी छापखान्यावर शर्मा आणि राऊत नावाच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मोराळे यांनी सुमारे चार ते पाच तास आरोपींकडे कसून चौकशी केली. मात्र आरोपींनी अजून ही पोलिसांसमोर महत्वाची माहिती उघड केलेली नाही.

या बनावड नोटा आता दिवाळी सणासुदीला बाजारात चलनात वापरल्या असाव्यात असा अदांज व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या नोटा इतर राज्यात पाठवण्यात आल्या आहेत का? याचा ही पोलीस तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा