पुणे,१५ऑक्टोबर२०२२: पुणेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने एक नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होणार आहेत. हा संप वीस ऑक्टोबर पासून सूरु होणार होता. मात्र पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्याने हा संप पूढे ढकलण्यात आला आहे.
विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री अनिश्र्चित कळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात सर्वाधिक प्रवासी वाहतूक ही तीनचाकी रिक्षा ही सीएनजीवर चालतात, त्यामुळे आता पुणेकरांना नाहक त्रास होणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनचालकांनी आपली आवड सीएनजी गाड्यांकडे दाखवली आहे. पुण्यात सर्वाधिक गाड्यां चारचाकी, बसेस, रिक्शा, ट्रक, मालवाहतूक कंटेनर अशी वाहने आहेत. असाही नेहमी सीएनजीसाठी पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
लांबच लांब रांगा नेहमी सीएनजीसाठी पुणेकरांना लावयला लागतात. आणि आता पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या या निर्णयाचा पूणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर