बीसीसीआयची मोठी घोषणा! टी ट्वेंटी विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची वर्णी

पुणे, १५ ऑक्टोबर २०२२ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ‘टी ट्वेंटी विश्वचषकासाठी’ दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी वेगवान आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. यापूर्वी शमीचे नाव टी ट्वेंटी विश्वचषक संघाच्या राखीव यादीत समाविष्ट होते.

दरम्यान बीसीसीआय कडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी बीसीसीआयने आपल्या अंतिम १५ खेळाडूंची यादी शुक्रवारी आयसीसीकडे पाठवली आहे.

मोहम्मद शमी यांनी काही दिवसांपूर्वी एमसीए मध्ये फिटनेस चाचणी पास केली होती. तो बुधवार दिनांक १२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना देखील झाला आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे.भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध दुपारी १.३० वाजता मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा