ऑस्ट्रेलिया संघला मोठा धक्का.! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी या खेळाडूची निवृत्ती

6

६ फेब्रुवारी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी : चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या १९ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलिया संघाची चिंता वाढली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत निवड झालेल्या खेळाडूने अचानक निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचाअनुभवी आणि स्टार फलंदाज मार्कस स्टॉयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. जी येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी पासून लागू होणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता दुसऱ्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया सध्या श्रीलंकेत कासोटी मालिका खेळत आहे. यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून महत्वाची असणार आहे. याच दरम्यान मार्कस स्टॉयनिसने आपली निवृत्ती घोषित केली आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाकडून ७४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०२३ मध्ये भारतात ऑस्ट्रेलिया संघाने वनडे विश्वचषक जिंकला त्यावेळी मार्कस स्टॉयनिसचा सुद्धा संघात समावेश होता.

निवृत्तीवर काय म्हणाला मार्कस स्टॉयनिस :

वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मार्कस स्टॉयनिसने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ऑस्ट्रेलिया संघासाठी वनडे क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी खूप चांगला प्रवास आहे. मैदानावर घलवलेला प्रत्येक क्षणाबद्दल तो कृतज्ञ असेल. पुढे मार्कस म्हणाला की, निवृत्ती घेणं हा निर्णय सोपा नव्हता.

स्टॉयनिसने आपल्या वनडे कारकिर्दीत ७१ सामने खेळून १४९५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर फक्त एक शतक आहे, त्याने १४६ धावांची नाबाद खेळी खेळली असून सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी २६ च्या आसपास आहे.त्याने फलंदाजी सोबत गोलंदाजीतही आपली शानदार कामगिरी दाखवली आहे. त्याच्या नावावर ४८ विकेट्सही आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा