पुणे ,१८ सप्टेंबर २०२२ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी तीन टी ट्वेंटी मालिका मंगळवारी २० सप्टेंबर मोहालीत सुरू होणार आहे. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धची’ मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे .कारण या मालिकेतून आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, हा संघाबाहेर गेला आहे.
मोहम्मद शमी मागच्या काही वर्षापासून भारताच्या टी ट्वेंटी संघात जागा बनवण्यासाठी झगडताना दिसत आहे. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेतून टी-ट्वेंटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. पण ही मालिका अगदी तोंडावर आली असताना शमीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागत आहे.
गेल्यावर्षी यूएईमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक झाला होता. तेव्हा मोहम्मद शमी खेळला होता, त्यानंतर शमी आतापर्यंत एकही टी ट्वेंटी सामना खेळलेला नाही. आयपीएल २०२२ मध्ये गुजरातच्या संघाने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया चा पहिला टी ट्वेंटी सामना २०, सप्टेंबर रोजी होणार आहे तर दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी होणार आहे या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव