पुणे, ४ ऑक्टोंबर २०२२: दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर झालाय. बुमराह सतत पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे.
नुकतीच जसप्रीत बुमराहने त्याच्या घरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिका खेळली. बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले. यानंतर तो दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडला.
बीसीसीआयची निराशा
तेव्हापासून, बुमराह विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता होती, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशिवाय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही बुमराह शेवटच्या क्षणापर्यंत सावरेल अशी आशा व्यक्त केली होती.
बीसीसीआयचे वैद्यकीय पथक बुमराहची चौकशी करत होते. पण आता बीसीसीआयने एक निवेदन जारी करून बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केलंय.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात काय म्हटलं?
बीसीसीआयने निवेदन जारी करताना म्हटलंय की, ‘बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला २०२२ च्या T20 विश्वचषकातून वगळलं आहे. सर्व प्रकारची तपासणी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
भारतीय बोर्डाने सांगितले की, ‘जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेतून आधीच बाहेर गेलाय. आता बीसीसीआय लवकरच विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संघाची घोषणा करणार आहे.
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना इंदूरमध्ये ४ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर भारतीय संघ ५ ऑक्टोबरला विश्वचषकासाठी उड्डाण करेल.
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे