सरकारचा मोठा निर्णय, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

मुंबई, दि. २६ जून २०२० : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोविड -१९ मुळे सर्वच परीक्षांवर टांगती तलवार होती. जून-जुलैच्या आसपास या विषाणूचा प्रभाव कमी झाल्यास परीक्षा घेण्यात येतील असा सरकारचा अनुमान होता मात्र दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने सरकारने अखेर अंतिम विद्यार्थ्यांच्या बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वर्षाची /अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. तसंच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून एमडी / एमएस या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसंच ही परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत तहकूब करण्याची विनंतीही राज्य शासनाने मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाला केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा