बुलेट ट्रेन बाबत मोठी बातमी, बनवण्यात आला पहिला सेगमेंट

नवी दिल्ली, 4 ऑक्टोंबर 2021: या सेगमेंटची लांबी 11.90 ते 12.4 मीटर, रुंदी 2.1 ते 2.5 मीटर आणि खोली 3.40 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं वजन सुमारे 60 मेट्रिक टन असल्याचं सांगितलं जातं आहे. आता असे नोंदवले गेले आहे की असे 19 सेगमेंट तयार केले जातील जेणेकरून 45 मीटरचा स्पॅन बनवता येईल.

तसं, यापूर्वी ऑगस्टमध्ये देखील बुलेट ट्रेनबाबत एक मोठे अपडेट आले होते. बुलेट ट्रेन चालवण्याची रचना तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर बुलेट ट्रेनच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या खांबांची लांबीही 13 मीटरपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. चार मजली इमारतीएवढा मोठा खांब बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होईल

देशाची पहिली बुलेट ट्रेन 12 स्थानकांवर थांबणार आहे आणि महाराष्ट्र, दादरा, नगर हवेली आणि गुजरातमधून जाईल. परंतु महाराष्ट्र सरकार या प्रकल्पामध्ये फारसा रस दाखवत नाही. याच कारणामुळं तेथील भूसंपादनाचं कामही पूर्ण झालेलं नाही. पण तरीही 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे