नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२२: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेट स्पीच प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. २००७ च्या कथित द्वेषयुक्त भाषण प्रकरणात सीएम योगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला आहे.
प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली मुख्यमंत्री योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली होती. यापूर्वी मे २०१७ मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे पूर्ण नाहीत. जे २०१८ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, या याचिकेत योग्यता नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास परवानगी देता येणार नाही. मुख्यतः हे प्रकरण गोरखपूर दंगलीचे आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीएम योगींच्या कथित भाषणाची चौकशी ची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
२००७ मध्ये गोरखपूरमध्ये उसळलेली दंगल याचिकाकर्ते परवेज परवाज यांनी सांगितले की, तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्या भाषणानंतर २००७ मध्ये गोरखपूरमध्ये दंगली चालू झाल्या होत्या . यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. युपी सरकारच्या सीआयडीने २००८ मध्ये नोंदवलेल्या एफआयआरची अनेक वर्षे चौकशी करण्यात आली. २०१५ मध्ये सीआयडी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. या रिपोर्ट मध्ये मे २०१७ राज्य सरकारने खटला चालवण्याची परवानगी नाकारली तोपर्यंत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले होते. अशा वेळी अधिकाऱ्यांनी हा निर्णय दबावाखाली घेतला असावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे