जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२२: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी जॅकलीन फर्नांडिस सोमवारी २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पटियाला कोर्टात हजर झाली होती.

जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. न्यायालयाने जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केलाय. वास्तविक, २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने अभिनेत्रीला समन्स बजावले होते. यानंतर अभिनेत्रीच्या वकिलांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला आणि आता कोर्टाने अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केलाय.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुमारे ८ तास जॅकलिनची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान जॅकलिन काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळताना दिसली. जॅकलिन व्यतिरिक्त EOW ने पिंकी इराणीलाही बोलावलं होतं. पिंकी इराणीने जॅकलिनला सुकेशबद्दल बोलण्यात मदत केली. मात्र चौकशीत दोघांची उत्तरं जुळली नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा