वेणूगोपाल धूत यांना मोठा दिलासा; कर्ज घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर

मुंबई, २० जानेवारी २०२३ :मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना सीबीआयने २६ डिसेंबर २०२२ रोजी कथित कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. विशेष सीबीआय न्यायालयाने ५ जानेवारी रोजी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर धूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धूत यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता आणि अंतरिम सुटकेची मागणी केली होती.

धूत यांचे वकील संदीप लड्ढा यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता की, धूत तपासात सहकार्य करत असल्याने त्यांची अटक अवाजवी आहे. मात्र, वेणूगोपाल धूत तपासात टाळाटाळ करत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता.

धूत यांनी आपल्या अटकेबाबत सादर केलेल्या याचिकेत, सीबीआयने आपली अटक मनमानी, बेकायदेशीर, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१ (ए) चे उल्लंघन आहे. या अटकेसाठी सीबीआयने कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा