लखनऊ, ६ जानेवारी २०२१: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. येथे भूमाफियांनी लखनऊ विकास प्राधिकरणाची (एलडीए) ५२४ बीघा (सुमारे ८००-८५० एकर) जमीन विकली. लखनौमध्ये चालू असलेल्या एलडीएची संपूर्ण राधाग्राम योजना भूमाफियांनी विकली.
आता ही बाब उघडकीस आल्यानंतर हा संपूर्ण प्लॉट रद्द करण्यासाठी लखनऊ विकास प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
लखनऊ विकास प्राधिकरणाने १९८४ मध्ये राधाग्राम योजना सुरू केली, ज्यात ५२४ बीघा जमीन होती. जेव्हा जमीन घेतल्यानंतर एलडीए योजना करण्यात व्यस्त होते, तेव्हा भूमाफियांनी बनावट मार्गाने या जमिनीला विकण्याची योजना आखली.
आता उघडकीस आले आहे की, डीलर्सनी एलडीएच्या अधिकाऱ्यांसोबत मुळून जमिनीची प्लॉटिंग करून ती खाजगी लोकांना विकायला सुरुवात केली. बर्याच काळापासून ही संपूर्ण कृती चालू असताना एलडीएने कोणताही आक्षेप घेतला नाही. पण आता कागदपत्रांची तपासणी सुरू असताना संपूर्ण घोटाळा उघडकीस आला आहे.
सध्या प्राधिकरण लखनौमधील विभागाच्या जमिनीची कागदपत्रे तपासण्यात व्यस्त आहे, त्या काळातील अशी अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. एलडीएशी संबंधित प्रकरणानंतर जमीन परत घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
बरेच दिवस राधाग्राम योजनेत काही कामे होऊ शकली नाहीत, म्हणूनच मालमत्ता विक्रेत्यांनी गेल्या दहा वर्षात जमीन बेकायदेशीर कट रचून विकली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे