गोल पोस्ट गुन्हा कर्जत मध्ये भरदिवसा मोठी चोरी

कर्जत मध्ये भरदिवसा मोठी चोरी

कर्जत, २१ ऑगस्ट २०२०: कर्जत येथील भणगेगल्ली मधील गोविंदशेठ भणगे यांच्या घरी रात्री बारा ते दोनच्या दरम्यान जबरी चोरी झाली आहे.

कर्जत शहराच्या मध्यवस्ती मधील भंगे गल्ली येथील गोविंदशेठ भणगे यांच्या घराची अनेक कुलपे तोडून चोरांनी धाडशी , पण जबरी चोरी केली आहे.  घरातील कपाट व स्वयंपाक घरातील डबे आदी सामानांची उलथा पालथ केली आहे, चोरांनी घरातील विविध दरवाजांची पाच कुलपे तोडताना कोणताही आवाज येणार नाही याची काळजी घेतल्याने शेजार राहणाऱ्या लोकांना चोरीचा अंदाज आला नाही.

गोविंदशेठ भणगे हे वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे गेले होते. याचा अंदाज घेऊन चोरांनी डाव साधला असून या चोरीत नेमका किती ऐवज लंपास झाला याची माहिती मिळू शकलेली नाही,  पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सह. पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. त्यांना बाळासाहेब चावरे यांनी माहिती दिली असून गोविंदशेठ भणगे हे आल्यानंतर याबाबत अधिकची  माहिती मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version