पाटणा, बिहार १५ जून २०२३: बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आलय. नीतीश कुमार हे त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात फेरफटका मारत असताना, अचानक दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आले, धडक बसणार इतक्यात नीतीश कुमार फुटपाथवर चढल्याने बाईकची धडक चुकली आणि नितीश कुमार थोडक्यात बचावले. सकाळी ६.४५ च्या सुमारास त्यांच्यासोबत ही घटना घडली. यातून ते बचावले आहेत.
नीतीश कुमार हे आज सकाळी सर्क्युलर रोडवर मॉर्निंग वॉक करत असतानाच, पाटण्यातील मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात अचानक दोन बाईकस्वार घुसले. त्यांनी नीतीश कुमार यांच्याजवळ गाडी नेली, पण धोका लक्षात आल्याने नितीश कुमार हे लगेचच फुटपाथवर चढल्याने अपघातातून ते थोडक्यात बचावले.
बिहार पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. या दुचाकीस्वाराची कसून चौकशी केली जात आहे. आजच्या या घटनेमुळे घातपाताची भीती व्यक्त केली जात असुन हल्ल्या मागे ‘लहरिया कट बाईक गँगचा’ हात असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर