गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई रिया चक्रवर्तीच्या शोधात बिहार पोलीस मुंबईत दाखल

रिया चक्रवर्तीच्या शोधात बिहार पोलीस मुंबईत दाखल

मुंबई, १ ऑगस्ट २०२० : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सर्वात जास्त चर्चेत असलेली व्यक्ती ठरली. मात्र सध्या रिया चक्रवर्ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी रविवारी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मात्र बिहार पोलीसांनी गुन्हा दाखल करत रिया चक्रवर्तीच्या शोधात मुंबई गाठलं.

बिहार पोलीस मुंबईत आले मात्र अद्यापही रिया चक्रवर्ती आणि बिहार पोलीसांची भेट झालेली नाही . पोलीसांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला चौकशीसाठी निरोप पाठवला होता मात्र त्यानंतर रिया चक्रवर्तीने कोणतेही उत्तर दिले नसल्याने तिच्या चौकशीसाठी एक टिम मुंबईत तैनात केली आहे. गेल्या मंगळवार पासून बिहार पोलीस हे रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या शोधात रिक्षा आणि त्यानंतर लक्झरी कारमधून फिरताना दिसले .

बिहार पोलिसांनी सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट, त्याचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट, त्याच्या कॉल डिटेल्सची एक आणि त्याच्या बँकेचे स्टेटमेंट देखील स्वत: कडे जमा करून घेतले आहे. रियाच्या घरच्यांना रिया आणि तिच्या भावाबद्दल विचारणा केली असता त्यांनी आम्हाला याबद्दल काही माहित नसल्याचे सांगितले त्यामुळे या प्रकरणाला काही वेगळेच वळण येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आधीच रिया चक्रवर्तीची झालेली नाचक्की आणि त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी रियाला सुशांतच्या मृत्यूस कारणीभूत ठरवले , सुशांत सोबत अनेक कंपन्यामध्ये रियाचे असलेले महत्वाचे पद आणि अगदी त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी रियाचा सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडीओ , सुशांतच्या वडीलांची तक्रार आणि त्यात बिहार पोलीसांकडून रियाचा घेतला जाणारा शोध त्यामुळे आणि यातच रियाचे असे अचानक गायब होणे या सर्व गोष्टी सुशांत सिंह राजपूतच्या केसला एक वेगळच वळण दिले आहे. आणि त्यामुळेच रिया चक्रवर्तीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उभारले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version