लखनऊ, १३ डिसेंबर २०२०: बसपाच्या प्रमुख मायावती आणि अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणताही मोठा करिश्मा दाखविला नसेल, पण, पाच पेक्षा जास्त जागा मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं. आता ही जोडी उत्तर प्रदेशमधील २०२२ च्या निवडणुकीच्या राजकीय लढाईत दलित-मुस्लिम कार्ड खेळण्यावर पैज लावंल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम’नंही बसपाकडं मैत्रीचा हात वाढविला आहे. अशा परिस्थितीत मायावती ओवेसीशी हातमिळवणी केल्यास राज्यातील राजकीय पक्षांची समीकरणं गडबडू शकतात.
बिहारच्या विजयानं प्रोत्साहित झालेल्या एआयएमआयएम’नं यूपीमध्ये पक्षाचा राजकीय आधार वाढवण्याची कवायद सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता एआयएमआयएम’नं संघटनेला धार देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या एका महिन्यात सुमारे २० जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पक्षात नवीन सदस्य जोडण्याची मोहीमही तीव्र करण्यात आली आहे.
एआयएमआयएम यूपीचे अध्यक्ष शौकत अली म्हणाले की, केवळ ओवैसी-मायावतीच उत्तर प्रदेशात जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखू शकतात. याशिवाय कोणताही सपा, बसपा आणि कॉंग्रेस भाजपला एकट्याने रोखू शकत नाही. शौकत अली म्हणाले की, यूपीमधील दलित आणि मुस्लिम या दोन्ही समाजाची समस्या समान आहे आणि लोकसंख्या जवळजवळ समान आहे. मागील निवडणुकीत आम्ही बसपाशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी तसे होऊ शकले नाही. बिहार निवडणुकीत एक राजकीय प्रयोग झाला आहे आणि जर तो यशस्वी झाला तर उत्तर प्रदेशातही हा प्रयत्न केला गेला पाहिजे.
ते म्हणाले की, सुमारे २१ टक्के दलित आणि २० टक्के मुस्लिम उत्तर प्रदेशात आहेत. अशा परिस्थितीत दलित मुस्लिम एकत्रितपणे भाजपला सत्तेत येण्यापासून रोखू शकतात. आमचा पक्ष सुरुवातीपासूनच दलित मुस्लिम ऐक्यात काम करत आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ते उतरवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. बसप कोणत्याही पाठिंब्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याच्या स्थितीत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे