बिल्किस बानोच्या दोषीवर पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल

4

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२२: बिल्किस बानो प्रकरणातील दोषी जून २०२० मध्ये पॅरोलवर आल्यानंतर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हाही दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. मितेश चिमनलाल भट असे या दोषीचे नाव आहे.

ही बाब गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. या प्रकरणी रणधिकपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करून तिच्या तीन वर्षीय मुलीसह कुटुंबातील १४ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ११ रोपी दोषी सिद्ध झाले. या गुन्ह्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, १४ वर्षे तुरुंगवासानंतर गुजरात सरकारने दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारे सोडून दिले. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. गुजरातमधील भाजप सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही यावरून टीका झाली.

एफआयआर नंतरही मितेश तुरुंगाबाहेर

५७ वर्षीय मितेश भट्टवर १९ जून २०२० रोजी रंडिकपूर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३५४, ५०४, ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मितेशला २५ मे २०२० पर्यंत ९५४ दिवसांचा पॅरोल, फर्लो रजे मिळाली होती. २०२० मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतरही तो २८१ दिवस तुरुंगाबाहेर होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा