कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस

उस्मानाबाद, २८ जून २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत राबविण्यात आलेल्या दोन योजनांमध्ये शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला आहे याविरूध्द काल दिनांक २७ जून २०२० रोजी ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत राबविण्यात आलेल्या दोन योजनांमधील ४ कंत्राटात साहित्य पुर्तता केली असे भासवून बनावट डिलीव्हरी चलनाद्वारे एकूण ९,५१,७२,१००/- रूपये एवढी रक्कम मंजूर करून अधीकारी तसेच ठेकेदारांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केलेल्या चौकशीत आढळून आले. त्या व्यक्ती- संस्थांविरुध्द प्रथम खबर नोंदवण्यासाठी नायब तहसीलदार संतोष सुरेश पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे. सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून श्री. संतोष पाटील, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी काल दिनांक २७ जून रोजी खालील प्रमाणे ४ गुन्हे
१) तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी- श्री. अभय देविदास मस्के,
२) मनोज औदुंबर मोरे, रा. उस्मानाबाद,
३) आध्या एन्टरप्रायझेस चे मालक- राजेंद्र गायकवाड, रा. समर्थ नगर उस्मानाबाद,
४) एटूझेड एन्टरप्रायझेस चे अज्ञात मालक,
५) ए.वन एन्टरप्रायझेस बालेवाडी, पुणे चे अज्ञात मालक,
६) इ झोन एन्टरप्रायझेस चे मालक- फहीम जलील शेख, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद या सर्वांच्या विरोधात भा.दं.सं. कलम- ४२०,४०९,४६७,४६८,४७१,३४ अन्वये नोंदवण्यात आला आहे. तसेच, श्री. मोतीचंद राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे या चारही गुन्ह्यांचा तपास सोपविण्यात आला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा