शाहू महाराजांचे चरित्र आता रशियन व इटालियन भाषेतही, अनुवाद ग्रंथाचे प्रकाशन ६ मे रोजी होणार

कोल्हापूर, ३ मे २०२३: शाहू संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू चरित्राचे राजर्षी शाहू रशियन व इटालियन चरित्राचे अनुवाद ग्रंथ प्रकाशन सोहळा शनिवारी ६ मे रोजी होणार आहे. शिवाजी विद्यापीठ येथील शाहू सिनेट सभागृहात सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे.

शाहू चरित्राचे राजर्षी शाहू रशियन व इटालियन चरित्राचे अनुवाद ग्रंथ प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू शिवाजी विद्यापीठ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अनुवाद ग्रंथाचे अनुवाद रशियन भाषेमध्ये डॉ. मेघा पानसरे व प्रा. तत्याना बीकवा आणि इटालियनमध्ये डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलारो यांनी केला आहे.

महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा