शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार; बोरवेअर खोदण्यासाठी मिळणार ५० हजारांचे अनुदान..

Birsa Munda Agricultural Scheme: राज्यातील शेतकाऱ्यांचा पाण्याच्या प्रश्नाला वाचा फुटणार आहे.महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसुविधा पुरविल्या जातात. ज्यामध्ये नवीन विहीरींचे खोदकाम, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पीव्हीसी पाइप बसवणे आणि जुन्या विहिरींची दुरुस्ती यांचा समावेश आहे. याशिवाय, सरकारने आता यामध्ये बोअरवेलचा देखील समावेश केला असून या योजनेद्वारे शेतकाऱ्यांना ५०,००० रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

या योजनेसाठी कोण पात्र असणार :

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.
अर्जदाराकडे वैध जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
अर्जदाराच्या नावावर सातबारा आणि आठ-अ उतारा असावा.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराच्या नावावर किमान 0.40 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे.

बोअरवेल अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे :

वैयक्तिक कागदपत्रे: आधारकार्ड,जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला
शेतीविषयक कागदपत्रे: सातबारा,100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र ,0.40 हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला विहीर नसल्याचा दाखला (बोअरवेलसाठी) 500 फुटांच्या परिसरात अन्य विहीर नसल्याचा दाखला

शासन व स्थानिक स्तरावरील कागदपत्रे: कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र ,गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव.

असा करा ऑनलाइन अर्ज :

महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर लॉगिन करा. शेतकरी योजना’ विभाग निवडा. 'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ हा पर्याय निवडून अर्ज भरावा.

महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर लॉगिन करा. शेतकरी योजना’ विभाग निवडा. ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ हा पर्याय निवडून अर्ज भरावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर