कौटुंबिक वादातून जन्मदात्याने केली मुलाची हत्या

भंडारा ११ ऑगस्ट २०२४ : कौटुंबिक वादातून बापाने मुलावर कुर्‍हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या तुमसर मध्ये घडली. धनराज ठाकरे (६१), असे आरोपी वडीलाचे नाव आहे, तर एकनाथ धनराज ठाकरे (४०), असे मृत मुलाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील रोंघा येथे धनराज ठाकरे हा शेतीचे काम करीत होता. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे.

वडील धनराज आणि मुलगा एकनाथ यांच्यामध्ये कौटुंबिक वादातून नेहमीच भांडण होत असे. मुलात व वडीलात वाद झाल्यानंतर वडीलाने मुलाच्या मानेवर कुर्‍हाडीने वार करुन हत्या केली. घटनेची माहिती गावकर्‍यांना मिळताच गावकरी आणि गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार विनोद गिरी व आंधळगाव ठाण्याचे ठाणेदार सोनवने यांनी घटनास्थळावर दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नितीन कुथे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा