हरियाणामधील नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि जेजेपीचा पराभव

चंडीगढ़, ३१ डिसेंबर २०२०: बुधवारी हरियाणातील नागरी निवडणुकांचे निकाल शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये सत्ताधारी भाजप-जेजेपीचा पराभव झाला आहे. २७ डिसेंबर रोजी झालेल्या नागरी निवडणुकीत प्रथमच सोनीपत, पंचकुला आणि अंबाला महानगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी थेट मतदान झाले. यामध्ये भाजपाच्या खात्यात पंचकुला आणि कॉंग्रेसच्या खात्यात सोनीपत नगराध्यक्षांची खुर्ची, जेजेपी कोणत्याही नगरपालिका व महानगरपालिका जिंकू शकली नाही.

हरियाणामधील ७ नागरी निवडणुकांचे निकाल सत्ताधारी भाजप-जेजेपी आघाडीसाठी निराशाजनक होते. या ७ पैकी फक्त रेवाडी नगरपरिषद आणि पंचकुला महानगरपालिकेतच भाजपाला कमळ फुलवण्यात यश आले, तर भाजपबरोबर युती करून लढणारी जेजेपी कोणत्याही नगरपालिका आणि महानगरपालिका जिंकू शकली नाही.

हरियाणामध्ये तीन महानगरपालिका, तीन नगरपालिका आणि एक नगर परिषद अशा ७ ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या आहेत. या ७ जागांपैकी भाजपा-जेजेपी आघाडीने केवळ रेवाडी नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि पंचकुला महानगरपालिकेचे नगराध्यक्षपद जिंकले, इतर पाच ठिकाणी भाजपला कॉंग्रेस व अपक्षां कडून पराभव पत्करावा लागला.

एकूणच नगरसेवकांच्या पदांबद्दल जर आपण बोललो तर भाजपाच्या नगरसेवकांच्या उमेदवारांची कामगिरी देखील तुलनेत कमीच दिसून आली. अगदी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या अंबाला येथेही महापौरपदासाठीची निवडणूक भाजपा हरली. भाजप-जेजेपीश
आघाडीचे उमेदवार तीनही नगरपालिकांवरील अपक्ष आणि कॉंग्रेस समर्थित उमेदवारांसमोर निवडणूक हरले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा