मुंबई, 14 जुलै 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हॅाटेल लीलामध्ये बैठक झाली. यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी परिषदेची सुरुवात फडणवीस यांनी केली. लोकांच्या हिताचे निर्णय या कॅबिनेट मध्ये घेण्यात आल्याचे फडणवीसांनी नमूद केले.
यावेळी एकनाथ शिंदेनी जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. इंधनावरचा दर कमी करण्यात आला असून पेट्रोलवर प्रति लीटर पाच रुपये आणि डिंझेलवर प्रतिलिटर तीन रुपयांची करकपात करण्यात आली आहे. त्यामुळं तब्बल 6000 कोटी रुपयांचा सरकारवर भार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कॅबिनेट मधून जाहीर करण्यात आली.
जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहे, त्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्यात आले नाही. याचबरोबर बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे.
तसेच सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडणार आहे. त्यामुळे मनाप्रमाणे प्रतिनिधी निवडता येणार आहे. वॅार्ड रचनेबाबत तक्रारी वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातल्या परिस्थितीवर आमचं लक्ष असून पूरग्रस्तांसाठी सगळ्या सुविधा आम्ही पुरवत आहोत. असेही त्यांनी सांगितले.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या सर्व लोकांसाठी सन्मान योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असून ठाकरे सरकारने काँग्रेसच्या दबावाखावी निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
उद्घव ठाकरे यांनी बदललेले सर्व निर्णय पुन्हा बदलले असून हा ठाकरे सरकारसाठी पुन्हा एक धक्का आहे. त्यामुळे अजून काय पुढे वाढून ठेवलय, हे काळानुसार समजेल. पण सध्या तरी शिंदे आणि फडणवीस ट्रेन जोरात आहे, हे मात्र खरं…
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस