महायुतीच्या ‘महाविजय २०२४ साठी’ महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता

8

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे .महायुतीतील घटकपक्ष म्हणून सहभाग नोदविण्यात आला आहे.

ॲड श्रीहरी बागल, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना ( मराठा राजकीय पक्ष) हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत असून महायुतीचा ‘महाविजय २०२४’ साकार करण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे यासाठी एकत्र येऊन ‘महाविजय २०२४’ साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनाही कामाला लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रसाद लाड, आमदार प्रतोद, समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करुण कामालाही लागले आहेत. प्रत्येक जिल्हा निहाय मेळावे घेण्यासही ते सुरुवात करत आहेत.

महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले त्याबद्दल महायुती सरकारचे पुनश्च धन्यवाद व आभार त्यांनी मानले असून समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास काही अडचणी असेल तर त्यांनी जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड श्रीहरी बागल यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीहरी बागल