पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातल्या मोदी बाग निवासस्थानी भाजपचे माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना आता उधाण आले आहे.
सत्तास्थापन करण्यासाठी सध्या काँग्रेस – राष्ट्रवादी-शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढू लागल्या आहेत. पुढच्या काही दिवसातच सत्तास्थापन करण्याचे संकेत दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षांतर करून भाजपत गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
त्यातच जयकुमार गोरे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्याविरोधात माण-खटावमधून निवडणूक लढवली आहे. शरद पवार आणि गोरे यांच्या भेटीने चर्चेला उधाण आले आहे.














































