पुणे, ६ सप्टेंबर २०२०ः राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचे आकडे हे विक्रम मोडत आहे. यातच आज पुणे शहराचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.
मोहिती जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश मुळीक यांना कोरोना असल्याची लक्षणे जाणवताच त्यांनी वेळ न दवडता कोरोनाची चाचणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. पुणे शहर कोरोनाच्या बाबतीत नवे नवे उच्चांक गाठत आहे. तसेच पुणे शहराची कोरोनाबाधीतांची संख्या ही १ लाखांच्या वर गेली आहे. या गोष्टीची भीती न बाळगता तेथील लोक शासनाच्या नियमांचे पालन करत नाही.
तसेच मास्क न घालणाऱ्या लोकांवर पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे











































