सातारा ८ डिसेंबर २०२३ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल शंका उत्पन्न करून सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणे हे एकच काम सध्या काँग्रेस कडे शिल्लक आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सावरकरांचा अपमान करून देशाचा अपमान केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून साताऱ्यातील पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी सातारा भाजपाचे पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी सातारा कडून साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर या घटनेचा निषेध करण्यात आला आणि काँग्रेसच्या नेत्यांनी असले धंदे बंद करावेत अन्यथा त्यांना साताऱ्यात पाय ठेवून देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, जिल्हा चिटणीस सुहास राजेशीर्के, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, नगरसेविका आशाताई पंडित, माजी नगरसेवक किशोर पंडित,प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, प्रशांत जोशी, चंदन घोडके, रवी आपटे, रोहिणीताई शिरसागर, प्रियाताई माने, अनिताताई बोडस, निशाताई जाधव, अमोल कांबळे, अमोल टंकसाळे, चैतन्य बोडस, अमित काळे, राजेश माजगावकर, पोपट महाडिक, चंद्रकांत माने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले