पूजा चव्हाणचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाने चोरल्याचा दावा

पुणे, ४ मार्च २०२१: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी अधिवेशनाच्या आधी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक भाजप नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच आता भाजप नगरसेवकाने पूजाचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप केला जात आहे. वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे.

घर बंद असताना देखील पूजा चा लॅपटॉप आणि मोबाईल मधील व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण च्या या गोष्टी घरातून चोरी गेल्या असल्याचा दावा सध्या केला जात आहे. संजय राठोड यांच्याशी निगडित काही ऑडिओ तसेच त्यांच्यावर ती बनवलेले काही व्हिडिओ सध्या बाहेर येत आहेत हे ऑडिओ आणि व्हिडिओ पूजाच्या लॅपटॉप मधून मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

पूजा चव्हाण संजय राठोड यांच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहत होती असे सांगितले जात आहे. संजय राठोड आपल्या मतदार संघात फिरत असताना नागरिकांशी भेटताना तसेच बोलताना चे काही व्हिडिओ तिच्या लॅपटॉप मध्ये सापडले आहेत. हे व्हिडिओ प्रचाराच्या हेतूने गाण्यांचा वापर करून एडिट केले गेले आहेत. म्हणजेच पूजा चव्हाण संजय राठोड यांच्या निवडणुकीचे कॅम्पेन चालवत होती किंवा असे व्हिडिओ कोणाकडून तरी बनवून घेत होती.

कोण आहेत धनराज घोगरे

धनराज घोगरे हे पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक असून भाजपच्या तिकिटावर ते वानवडी मधून निवडून आले होते. तसेच ते पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणात ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे त्यामध्ये यांचादेखील समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा