भाजप ॲक्शन मोडमध्ये …

2

मुंबई, 9 जून, 2022: राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेची तयारी सगळ्याच पक्षांनी सुरु केली. या पार्श्वभूमीवर भाजपची आज बैठक होणार आहे. त्यात खासकरुन फडणवीस कोरोनानंतर आता ॲक्शन मोडमध्ये दिसले आहेत. विधानसभेच्या उमेदवारांचा अर्ज आज दाखल करणार आहे. त्यात पाचवी जागा उमाताई खापरे यांना देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी अर्ज भरला.

तर आज सदाभाऊ खोत यांना सहावी जागा देत ते अपक्ष म्हणून लढणार आहेत. तर त्यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. तर विनायक मेटे मात्र विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानंतर नाराज आहेत. पण राज्यसभेसाठी आम्ही दिलेला शब्द पाळू. मग चर्चेनंतर आम्ही विघानसभेच्या पाठिंब्यासाठी निर्णय घेऊ, असे विनायक मेटेंनी सूत्रांना सांगितले.

आता आघाडी आणि बिघाडीच्या या चर्चेत भाजपच्या हाती काय लागणार आणि भाजपकडून काय जाणार , हे 13 जून नंतर कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा