उत्तर प्रदेश, १५ जानेवारी २०२२ : सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सगळे पक्ष एकमेकांवर टीका-टिपण्णी करत आहेत. पण हे करत असताना आलेली संक्रांत ही भाजपला तारक ठरेल की मारक हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे. याला कारण आहे उत्तरप्रदेशात संक्रांतीच्या दिवशी भाजपच्या प्रमुख नेत्यांचे पक्षांतर . योगी आदित्यनाथ यांच्या गटातील स्वामीप्रसाद मौर्य, भगवती सागर, विनय शाक्य, रोशनलाल वर्मा, मुकेशकुमार वर्मा, आणि ब्रजेशकुमार प्रजापती यांनी भाजपला रामराम ठोकला आणि समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
एकीकडे नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशात पुन्हा भाजप येण्याची स्वप्ने पहात असताना हे खंदे वीर भाजपला सोडून गेले , हा भाजपला नक्कीच मोठा धक्का आहे. यांचे परिणाम अर्थात निवडणुकीत दिसतीलच. ही परिस्थिती असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या मनात नक्की काय चाललंय , हे कळणं मात्र कठीण आहे. संक्रांतीच्या निमित्ताने योगी यांनी दलिताच्या घरी खिचडीचा आस्वाद घेतला आणि समानतेचा संदेश दिला. हे जरी खरं असले तरी यामागचा हेतू हा नक्कीच वेगळा आहे. दलित मतांचा आधार मिळाल्यास निवडणुकांचे पारडे फिरण्यास नक्कीच मदत होणार आहे. हे राजकारण करणे आणि कळणे , या दोन्ही गोष्टी आता निवडणूकीच्या निकालानंतरच कळतील. तूर्तास निणडणुकीचे रणशिंग फुंकले आणि पक्ष चाल करण्यास तयार झाले आहे. संक्रातीच्या या संक्रमणानंतर भाजपला तिळगूळ गोड लागणार का कडू याकडे लक्ष द्यावं लागेल.
So just wait and watch. War begins
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस