गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसच्या नेत्याला लगावला टोला, म्हणाले…

भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसच्या नेत्याला लगावला टोला, म्हणाले…

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२०: सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सोशल मीडिया वर खूप चर्चेत आहे. शेतात शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर वरून जात असताना मखमलचा सोफा आणि राहुल गांधी हे दोघे ही ट्रोल झाले होते. यानंतर आज पुन्हा राहुल गांधी चर्चेत आले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले होते, “आमची सत्ता आली तर आम्ही चीनला १५ मिनिटात बाहेर फेकू” असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या वक्तव्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

निलेश राणे यावर उत्तर देत म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.”

दरम्यान, निलेश राणेंच्या या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसतर्फे काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version