भाजपरुपी विषारी साप आमच्या घराजवळच्या अण्णाद्रमुक पक्षरुपी कचऱ्यात लपलाय, उदयनिधींची विखारी टीका

तमिळनाडू, ११ सप्टेंबर २०२३ : सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आलेले तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टाॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन, यांची जीभ पुन्हा घसरली. तमिळनाडूच्या नेवेली येथे एका विवाह समारंभात बोलताना त्यांनी भाजपला ‘विषारी साप’ असे संबोधल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

काही दिवसांपूर्वी लोकसभा खासदार आणि द्रमुकचे उपसरचिटणीस ए राजा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपवर बोचरी टीका करताना विषारी साप असे संबोधले आहे. अण्णाद्रमुकची खिल्ली उडवताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, अण्णाद्रमुक पक्षाला कचरा मानतो. विषारी सापाला भाजप मानतो.

विवाह समारंभात बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, जर एखाद्या विषारी साप तुमच्या घरात शिरला तर त्याला फक्त फेकून देणं पुरेसे नाही. कारण तो तुमच्या घराजवळील कचऱ्यात लपून बसू शकतो. मी तमिळनाडूला आमचं घर मानतो, विषारी सापाला भाजप मानतो आणि आमच्या घराजवळचा कचरा अण्णाद्रमुक पक्षाला मानतो. असे त्यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा