उरुळी कांचन महावितरण कार्यालयासमोर भाजपचे टाळे ठोको आंदोलन

उरुळी कांचन, ५ फेब्रुवरी २०२१: महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात लोटण्याचे काम करत आहे. आघाडी सरकारचा आज उरळीकांचन महावितरण कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, वीज बिले माफ झालीच पाहिजे अशा घोषणा आज उरुळी कांचन महावितरण कार्यालय समोर देण्यात आल्या, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे.

थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदन शील आहे. हे यावरून दिसून येते. कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही व विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका व जबरदस्तीने बिल वसुली करू नका, सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कट करू नका अशी मागणी करण्यात पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे व मध्य हवेली तालुका अध्यक्ष धनंजय आप्पा कामठे यांच्या नेतृत्वात महावितरणचे अधिकारी, रवींद्र मुसळगे शाखा अभियंता फुरसुंगी, अभिजीत खाडिलकर कनिष्ठ अभियंता टेस्टिंग मुळशी विभाग, मस्के प्रधान तंत्रज्ञ यांनी निवेदन स्वीकारले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा