धुळे, २२ ऑगस्ट २०२०: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आले आहे. यात अशीच एक घटना समोर आली आहे.
बीजेपीचे आमदार मंगेश चव्हाण यांची कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे रहिवासी आहेत. तसेच पाचोरामधील किशोर पाटील यांचीही कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचं समजलं आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वर शेअर केलेल्या माहितीनुसार ते म्हणाले ,”मला कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत होती, लक्षणं दिसून आल्यानंतर मी चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सेल्फ क्वारंटाईन आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करू घ्यावी.” असे त्यांनी फेसबुकद्वारे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे