उरुळी कांचन येथे भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे सेवा सप्ताहाचा कार्यक्रम सपन्न!

2

उरुळी कांचन, दि. २२ सप्टेंबर २०२०: देशभरात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याचे पाहुन उरुळी कांचन येथील गरजू कुटुंबांना सॅनिटायझर, मास्क, वाफेचे मशीन, या वस्तूंचे वाटप उरुळी येथील जिजाऊ सभागृहात करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम भाजपा ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सागर भूमकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे.

यावेळी धर्मेंद्र खांडरे यांनी हा वस्तू वाटपाचा कार्यक्रम नसून आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठीचे अभियान आहे, असे सांगितले, तर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य सुरक्षा वस्तुंचे वाटप करून गोर-गरीब जनतेच्या सेवेचा खारीचा वाटा उचलत आहे असे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सागर भुमकर म्हणाले आहेत.

त्याच बरोबर कृषी सशक्तीकरण व संरक्षण विधेयकामुळे शेतकऱ्यांना संपुर्ण देशात बाजारपेठ खुली होणार असून शेती उद्योगाचा विस्तार झाल्याने नवीन होतकरू तरुणांना व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. असे व्यापार आघाडी भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विकासदादा जगताप यांनी बोलताना सांगितले आहे.

भाजपा नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या घोषणा पत्रातील सर्व कामे पूर्ण करत असल्याचे भाजपा हवेली तालुका अध्यक्ष सुनील कांचन, यांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी कार्यक्रमाला भाजप पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकासदादा जगताप, पुणे जिल्हा भाजप संघटन सरचिटणीस धर्मेद्रजी खांडरे, हवेली तालुका भाजप अध्यक्ष सुनील कांचन पाटील, उरुळी कांचन माजी उपसरपंच संतोष हरिभाऊ कांचन, भाजपा उरुळी कांचन शहराध्यक्ष श्रीकांतजी कांचन, पुणे जिल्हा सरचिटणीस सुदर्शनजी चौधरी, सुनीलजी तुपे, सुभाष टिळेकर,ओंकार कांचन, शेखर टिळेकर, अभिजित महाडिक, जयेश जाधव, कुणाल वणारसे, रोशन वणारसे, व निलेश कानकाटे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा