मनसेला भाजप कडून युतीची ऑफर, पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, राज ठाकरे यांचे वक्तव्य

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ : भाजपने मनसेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असे मोठे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचे भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचे नेमके गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा