पंकजा मुंढेंना भाजपने नाकारलं विधानपरिषदेचं तिकीट, संमिश्र प्रतिक्रिया

मुंबई, 9 जून, 2022: पंकजा मुंडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर भाजपवर आता महाविकास आघाडीनं टीका करायला सुरुवात केली. पंकजा मुंडे यांचं नाव पुसायचा प्रयत्न भाजप करत आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. तर संजय राऊत यांनी सांगितलं की, कोणाला पद द्यायचं आणि कोणाला नाही , हा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पण निर्णय घेणाऱ्यांना हे समजत नाही.

भाजपचा सूर वेगळा आहे. पंकजा ताईंसाठी नक्कीच मोठं काहीतरी पद देण्याची वरिष्ठांची आखणी असेल, अशी सारवासारव भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

तसेच भाजपमध्ये फडणवीसांची हुकूमशाही सुरु असून जाणून बुजून पंकजा ताईंचे नाव आणि अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

परभणीमध्ये मात्र नागरिक चिडले आहे. ताई नाही तर कमळ नाही. कमळ हद्दीपार करु, असं म्हणत परभणी आणि जळगाव नागरिकांनी रस्त्यावर टरबूज फोडत नाराजी व्यक्त केली.

आता भाजप यावर काय निर्णय घेतात आणि पाठिंबा मिळवणार का? हे लवकरच समजेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा