पणजी, 22 जानेवारी 2022: यावेळी गोव्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ते गोव्यातील पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे अनेक दिवसांपासून भाजपशी वाद सुरू होते आणि आता त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्पल यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाद सुरू होते, आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू होता. याचा परिणाम असा झाला की भाजपने आपल्या पहिल्या यादीत उत्पल यांना उमेदवार म्हणून घोषित केलं नाही आणि आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
या निर्णयाबाबत उत्पल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांनी दोन दशके पणजीची सेवा केली आहे. त्यांच्यात विशेष नाते आहे. माझेही येथून घट्ट नाते आहे. मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं भाजपला सांगितलं. मात्र तरीही मला उमेदवारी देण्यात आली नाही. मी तत्वांसाठी लढत आहे.
पण उत्पल यांनी यापूर्वी पणजीतून निवडणूक लढवण्यात रस दाखवला नव्हता, पण 2021 मध्ये ते अचानक इथल्या राजकारणात सक्रिय झाले. असे असतानाही पक्षाने उत्पल यांना तिकीट देण्यास नकार दिला. याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नेत्याचा मुलगा असणं ही पात्रता नाही. मात्र, पक्षाने पणजीऐवजी बिचोलीमची जागा उत्पल यांना देऊ केली. पण काही न झाल्याने उत्पल यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.
भाजपच्या यादीबद्दल बोलायचं झालं तर 34 उमेदवारांच्या यादीत 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. मांद्रेम जागेसाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उमेदवारी काढून पक्षाने दयानंद सोपटे यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे