नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप २०२४ मध्ये सरकार स्थापन करेल – नितीन गडकरी

पुणे, २ जून २०२३: २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा विजयी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी (१ जून) एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, सरकारने गेल्या ९ वर्षात देशाच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. तसेच, गरिबी हटवण्याचे आणि भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रोजगार वाढवण्याची गरज आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, भारताची सर्वात मोठी समस्या भूक, गरिबी आणि बेरोजगारी आहे. ग्रीन हायड्रोजन, एलएनजी आणि वीज या प्रदूषणमुक्त इंधनांवर चालणाऱ्या बांधकाम कामात वापरल्या जाणारे उपकरणांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. तसेच बांधकामाच्या दर्जाशी तडजोड न करता त्याची किंमत कमी करणे आवश्यक आहे.

नितीन गडकरींचे आणखी एक विधान चर्चेत आहे. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, उत्तराखंडमधील पिथौरागढपासून सुरू होणाऱ्या कैलास मानसरोवर मार्गाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हिंदू मंदिरांबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. चांगल्या धर्मशाळा नाहीत. लंडनमधील गुरुद्वाराला, रोममधील चर्चला आणि काही देशांतील मशिदींनाही भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तिथले वातावरण स्वच्छ होते. त्यांना पाहून एखाद्याच्या श्रद्धेची ठिकाणे स्वच्छ असावीत, असे नेहमी वाटते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा